कोंडाजी र्फजद हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील ज्वलंत अध्याय आता मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर पराक्रम गाजविलेल्या अनेक पराक्रमी योद्धय़ांपैकी कोंडाजी र्फजद हे एक.काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या या योद्धय़ाच्या पराक्रमाची यशोगाथा र्फजद या चित्रपटाच्या रूपातून आपल्यासमोर येणार आहे. कोंडाजी फर्जद आणि मावळ्यांनी किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती, या धाडसाची गाथा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जद’ या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार आहे. या सिनेमाची पहिली झलक नुकतीच इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली आहे. 11 मे 2018 ला कोंडाजी र्फजद प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वामी समर्थ मूव्हीजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews